आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहव्‍वूर राणाला 14 वर्षांची शिक्षा, शिकागो कोर्टाच्या निर्णयाला राणा आव्हान देणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो- मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ला आणि डेन्मार्कचा कट प्रकरणातील मास्टर माईंड डेविड कोलमन हेडलीचा साथीदार तहव्वूर राणाला अमेरिकेतील शिकागो कोर्टाने 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तहव्वूर राणावर लष्कर ए तोएबाला मदत केल्याचाही आरोप आहे. दरम्यान, शिकागो कोर्टाने दिलेल्या शिक्षेला तहव्वूर राणा वरिष्ठ कोर्टात आव्हान देणार असल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले.

मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍यापूर्वी 52 वर्षीय हेडलीने मुंबईतील कोणत्या ठिकाणी हल्ले करायचे याची रेकी केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. हेडलीने 2010 मध्ये आपल्यावरचे सर्व आरोप कबूल केले होते.त्या आधारावरच राणालाही दोषी ठरवण्यात आले. राणाला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची माहिती होती. दहशतवादी गट आणि त्यांच्या पाकिस्तानातील नेत्यांच्या तो संपर्कात होता, असा आरोप सरकारी वकिलांनी केला होता; तर कायम खोटे बोलणाऱ्या हेडलीने राणाला फसवल्याचे राणाच्या वकिलांनी म्हटले होते. त्‍यामुळे त्‍याला कमी शिक्षा करावी, असा बचावपक्षाचा दावा होता.