आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taipai Defence Minister Give Resignation Due To Mobile Thief

मोबाइल चोराच्या मृत्यूमुळे तैपेईच्या संरक्षण मंत्र्यांनी दिला राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैपेई - लष्करी प्रशिक्षण सुरू असताना एका युवकाने कोणाचा तरी मोबाइल आणि कॅमेरा चोरला. शिक्षा म्हणून सैनिकांनी त्याला अटक केली. कठोर व्यायाम करवून घेतला आणि एवढी मारहाण केली की त्यातच त्याचा मृत्यू झाला. सैनिकांच्या या कृत्यावर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर तैवानचे संरक्षण मंत्री काओ हुआ चुको यांना रविवारी राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि लष्कराच्या चार ज्येष्ठ अधिकार्‍यांना अटकही करण्यात आली आहे.

तैवानमध्ये 18 ते 36 वयोगटातील युवकांसाठी एक वर्षाचे लष्करी प्रशिक्षण सक्तीचे आहे. हुंग चुंगचीयू या 24 वर्षीय युवकही अशाच प्रशिक्षणात सहभागी झाला होता. 3 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. 6 जुलै रोजी त्याचे प्रशिक्षण संपणार होते.