तैपेई - तैवानच्या दक्षिणेकडील काओसियांग शहरात गॅस गळतीमुळे शक्तिशाली स्फोट झाला. त्यात किमान 25 जण ठार तर 270 जण जखमी झाले. भूमिगत गॅस पाईपलाईनचा स्फोट झाल्यामुळे रस्त्याचे रूपांतर एका मोठ्या खड्ड्यात झाले. स्फोटाच्या अगोदर गॅससारखा धूर पाहायला मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. स्फोटामुळे आग लागली आणि त्यात अनेक कार जळून खाक झाल्या. त्यामुळे परिसरात घबराट आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. स्फोटाच्या आवाजाने 3 किमी परिसर हादरला. वाहिनीतून पेट्रोरासायनिक पदार्थ वाहून नेले जात.