आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानच्या सरावाने चिनी सागरात तणाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैपेई - दक्षिण चिनी सागरातील एका बेटावर तैवानकडून सोमवारी लष्करी सराव करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.


तैवानच्या ताब्यातील या बेटावर बंदुकीच्या 2000 फैरी झाडण्यात आल्या, अशी माहिती तटरक्षक दल प्रशासनाचे प्रमुख वँग-चीन-वँग यांनी संसदेत दिली. दक्षिण चिनी सागरी क्षेत्रात बेटांची रांग आहे. त्यावर तैवान, चीन, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाइन्स, ब्रुनेई यांच्याकडून मालकीचा दावा करण्यात येतो. लष्करी सराव एप्रिलच्या मध्यावर करण्यात आला. तैपेई बेट हा आमचा भूप्रदेशाचा भाग आहे. तुम्हाला जे वाटले ती गोष्ट तुम्ही केलेली आहे. तुम्ही चांगले काम केले आहे, असे तैवानीचे लोकप्रतिनिधी लीन यू फांग यांनी सांगितले. बेटांजवळील हा मार्ग महत्त्वाचा जलमार्ग मानला जातो.