आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलाला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याने तालिबानचा जळफळाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - मुलींच्या शिक्षणासाठी दहशतवाद्यांचा मुकाबला करणारी पाकिस्तानची मलाला युसूफझाई हिला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, तिच्यावर हल्ला करणा-या तेहरिक-ए-तालिबानचा मात्र जळफळाट झाला आहे. संघटनेने पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल निषेध केला. त्याचबरोबर मलाला ईश्वराला न मानणारी असल्याचा आरोप केला आहे. तालिबानच्या एहसानउल्लाह एहसान याने मलालाला देण्यात आलेल्या नोबेल पुरस्काराचा निषेध केला. ती इस्लामचे प्रतिनिधित्व करण्यास अयोग्य असल्याचे म्हटले आहे.