आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावरसारखेच हादरले होते बेस्लान शहर, दहशतवाद्यांनी घेतले होते शेकडो चिमुरड्यांचे प्राण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर- पाकिस्तानातील पेशावर मंगळवारी दहशतवादी हल्ल्याने हादरले. सहा तालिबानींनी पेशावरमधील लष्करी शाळेवर हल्ला करून सुमारे 500 निरागस विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अपहरण केले होते. त्यापैकी 132 जणांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. त्यात 84 ‍चिमुकल्यांचा समावेश आहे. याशिवाय 144 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानी संघटना 'तहरीक-ए-तालिबान'ने स्विकारली आहे.

बेस्लान शहरही हादरले होते दहशतवादी हल्ल्याने....
पेशावरमधील हल्ल्याप्रमाणेच रशियातील बेस्लान शहरातील एका शाळेत 10 वर्षांपूर्वी काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 3 सप्टेंबर 2004 रोजी बेस्लान शहर दहशतवादी हल्ल्याने हादरले होते.

17 शस्त्रधारी दहशतवाद्यांनी तीन जणांसह शेकडो विद्यार्थ्यांना तब्बल तीन दिवस वेठीस धरले होते. रशियन आर्मीने ओलिसांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मिलेट्री ऑपरेशन राबवले होते. या दहशतवादी हल्ल्यात 334 जणांचा मृत्यु झाला होता. त्यात 186 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दहशतवादी हल्ल्यांनी हादरले आहेत जगातील अनेक देश...