आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Attack On Pakistan\'s Army School, 132 Students Died, Seven Terrorist Killed

पेशावर हल्ला : पाकिस्तानात सत्तापालटाची शक्यता, ISIS पाळंमुळं रोवण्याची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर/ नवी दिल्ली - पाकिस्तानात अतिरेक्यांनी लष्कराच्या शाळेत घुसून १३२ हून अधिक चिमुरड्यांना क्रूरपणे मारून टाकले. अतिरेक्यांनी बहुतांश मुलांच्या डोक्यात गोळ्या मारल्या. सुमारे आठ तास चाललेल्या कारवाईनंतर लष्कराने सर्व ७ अतिरेकी ठार केले. दरम्यान, या प्रकारानंतर पाकिस्तानात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ISIS ची पाळंमुळे रोवली जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
घटना घडली तेव्हा शाळेत ११०० हून अधिक विद्यार्थी होते. चिमुरड्यांना गोळ्या घालणा-या याच अतिरेक्यांनी मलालाच्याही डोक्यात गोळी झाडली होती. पाकिस्तानी लष्कराने आमची कुटुंबे उद‌्ध्वस्त केली. आम्हाला त्यांनी किती यातना दिल्या याची जाणीव पाकिस्तानी लष्कराला व्हावी म्हणून आम्ही हा नरसंहार घडवला, अशी निर्लज्ज मखलाशी तालिबानने केली आहे. पाकिस्तानच्या एखाद्या शाळेवर झालेला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा नृशंस अतिरेकी हल्ला असून या हल्ल्याचा केवळ पाकिस्तानातच नव्हे तर जगभर तीव्र निषेध केला जात आहे. भारतानेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

मुले डेस्कवर मान खाली घालून बसली, अतिरेकी बेछूट गोळ्या घालत सुटले
पाकमध्ये तख्तपालट होणे शक्य!
लष्करी अधिका-यांच्या मुलांना प्रथमच इतक्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आले. पाक वाहिन्यांनुसार सैन्यात प्रचंड रोष आहे. अतिरेक्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडण्याची त्यांची तयारी आहे. सरकारने तत्काळ कारवाई करण्याची मागणी असून, विलंब झाल्यास तख्तपालटही होऊ शकतो. लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी तसे संकेत दिले.

मुंबईसह ९ शहरांत अलर्ट
गुप्तचर यंत्रणांनी मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गोवा, इंदूर, जयपूर आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, अंगावर काटा उभा करणारे घटनेचे वर्णन... बघा फोटो...