आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Attack On Pakistan's Army School, Brief Chronology Of Attack

पाकिस्तान बालसंहार: आवाज निघू नये म्हणून मी तोंडात टाय कोंबली...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिरेकी दणादण अंदाधुंद गोळ्या झाडत होते. निष्पाप मुलांच्या डोक्यांवर निशाणा साधत होते. ज्यांनी बेंचखाली लपण्याचा प्रयत्न केला, त्यांची अतिरेक्यांनी तेथेच चाळणी करून टाकली.जे वाचले त्यांनी बाहेर येऊन सांगितलेली भयतांडवाची आपबीती...
हल्ल्यातून बचावलेला शाहरुख म्हणाला-
आम्ही करिअर मार्गदर्शनच्या वर्गात बसलो होते. त्या वेळी लष्करी वेशात असलेले चार गनमॅन आत आले. काही कळायच्या आतच त्यांनी ‘अल्लाहो अकबर’चा नारा देत गोळीबार सुरू केला. आम्ही सर्व प्रचंड घाबरलो होतो. मुले त्यांच्या जागीच टेबललाखाली लपू लागली. तेवढ्यात एक म्हणाला, ‘टेबलाखाली लपलेल्यांना तिथेच मारा.’ काळे बूट घातलेला एक अतिरेकी माझ्याचकडे येत होता. आवाज येऊ नये म्हणून मी टाय गुंडाळून तोंडात घातली. प्राण वाचवण्यासाठी लपलेल्या माझ्या मित्रांना त्याने शोधून शोधून मारले. काळ्या बूटात साक्षात मृत्यूच समोर असल्याचे मला वाटत होते.
अतिरेक्यांना मेल्यासारखे वाटावे, अशीच ती निपचीत पडून राहिली
माझ्या मैत्रिणीची मुलगी हल्ल्यातून वाचली. हल्ला मुलांच्या वर्गांमध्ये झाला. मुलींचा वर्ग दूर होता. हल्ल्यानंतर ती तिच्या भावाला शोधण्यासाठी आली. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. ती दुस-या वर्गात गेली तर तिथे गोळीबार सुरू होता. तिचे कपडे रक्ताने माखलेले होते. तेवढ्यात ती जमिनीवर कोसळली. अतिरेक्यांना मेल्यासारखे वाटावे म्हणून ती तशीच निपचीत पडून होती.

अतिरेकी प्रत्येक वर्गात गोळ्या झाडत होते
गोळीबार सुरू होताच आम्ही वर्गाकडे धावायला सुरुवात केली. त्यावेळी वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांची पार्टी चालू होती. त्यामुळे तेथे विद्यार्थ्यांची गर्दी होती. इमारतीच्या वरच्या मजल्यावर ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होत्या. मी हल्लेखोरांना पाहिले होते. त्यांची संख्या सहा किंवा सात असावी. ते प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना गोळ्या घालत होते.
- विद्यार्थी .
पुढे वाचा गोळ्यांचा आवाज ऐकताच मुलांना वाचवणारी शिक्षिकेविषयी...