आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Attack Prison In Northwest Pakistan Holding Militants

पाकिस्‍तानात तालिबानी दहशतवाद्यांचा तुरुंगावर भीषण हल्‍ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर- पाकिस्तानमध्ये डेराइस्माईल खान येथील मध्‍यवर्ती तुरुंगावर आज (मंगळवार) सकाळी शेकडो तालिबानी दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. पाकिस्‍तानी सैन्‍य आणि दहशतवाद्यांमध्‍ये जोरदार चकमक सुरु असून काही कैदी पळून जाण्‍यात यशस्‍वी ठरल्‍याची माहिती आहे. पाकिस्तानमध्ये आज अध्यक्षीय निवडणूक होत आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर डेराइस्‍माईल खान आणि इतर काही शहरांमध्‍ये संचारबंदी लागू करण्‍यात आली होती. तरीही दहशतवाद्यांनी हल्‍ला केला.

या तुरुंगात 5 हजार कैदी आहेत. त्‍यापैकी 250 कैदी हे तालिबान व संबंधित दहशतवादी गटाचे आहेत. त्‍यांन सोडविण्‍यासाठी हा हल्‍ला करण्‍यात आला. तहरिक-ए-तालिबानने या हल्‍ल्‍याची जबाबदारी स्विकारली आहे. हल्‍ल्‍यामध्‍ये 100 पेक्षा जास्‍त दहशवादी आणि अनेक आत्‍मकघातकी हल्‍लेखोरांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्‍या वेशात हल्‍ला केला. भल्‍या पहाटे काही दहशतवाद्यांनी परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. त्‍यानंतर अंधाराचा फायदा घेत मोठा हल्‍ला करण्‍यात आला.

गेल्‍या वर्षी एप्रिलमध्‍येही तालिबानी दहशतवाद्यांनी बान्‍नू येथील तुरुंगावर हल्‍ला केला होता. त्‍यावेळी 400 दहशतवादी पळून गेले होते. त्‍यापैकी 20 दहशतवादी कुख्‍यात होते.