आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायग्रा - ब्लू फिल्मवर तालिबान्यांनी घातली बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानातील तालिबान्यांनी पौरुषत्व वाढविणारी औषधे आणि ब्लू फिल्मच्या सीडी विक्रीवर बंदी घातली आहे. या अजब फतव्यात तालिबान्यांनी हे सर्व इस्लामी कायद्याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी, जे कोणी या फतव्याच्या विरोधात जातील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. अशी सक्त ताकिद पेशावर येथील दुकानदारांना दिली आहे. पेशावर मधील दुकानदारांनी सांगितले की, त्यांना हस्तलिखीत पत्र मिळाले आहे. त्यात पोर्न फिल्मच्या सीडी आणि व्हायग्रा सारखी शक्तीवर्धक औषधे विकणे इस्लामी कायद्याविरोधात असल्याचे म्हटले आहे. या वस्तूंची विक्री करणा-यांनी ती बंद करावी. त्यांनी दुसरा एखादा कायदेशिर धंदा सुरू करावा. या फतव्याची अंमलबजावणी जो करणार नाही त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्यात देण्यात आली आहे.

पेशावरमधील कारखानो बाजारात अनेक दुकानांमध्ये पोर्न फिल्म सीडींची सर्रास विक्री केली जाते. येथे गेल्या काही वर्षात अनेकवेळेस बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यावेळी सीडी-डीव्हीडी विक्री करणा-या दुकांनाना लक्ष्य करण्यात आले होते. गेल्या शुक्रवारी पाकिस्तानातील ओरकजई भागात सीडी-डीव्हीडींच्या दुकानाजवळच स्फोट झाला होता. त्यात १० ठार आणि २६ जण जखमी झाले होते.