आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफगाणिस्‍तानात बॉम्‍बस्‍फोटात 8 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबुल- अफगाणिस्‍तानची राजधानी काबुलजवळ तालिबानी दहशतवाद्यांनी बॉम्‍बब्‍लास्‍टद्वारे एक मिनिबस उडविली. या बॉम्‍बब्‍लास्‍टमध्‍ये 8 जण ठार तर 5 जण जखमी झाले. रिमोट कंट्रोलच्‍या साह्याने स्‍फोट घडविण्‍यात आला. बसमध्‍ये सर्वसामान्‍य नागरिक प्रवास करीत होते. पहाटे पाचच्‍या सुमारास हा स्‍फोट झाला. बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो तालिबानी संघटनेचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये या भागात तालिबानकडून होणारे हल्‍ले वाढले आहेत. अमेरिकेच्‍या सैन्‍यकपातीनंतर हल्‍ल्‍यांमध्‍ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्‍या पाच वर्षांमध्‍ये झालेल्‍या हल्‍ल्‍यांमध्‍ये हजारो जणांचा मृत्‍यू झाला आहे. गेल्‍या वर्षी 3 हजार जणांचा मृत्‍यू झाला होता.