आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात तालिबानकडून तीन अतिरेक्यांचा शिरच्छेद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर - तालिबानने आपल्या विरोधी गटाच्या तीन अतिरेक्यांचा शिरच्छेद करून खैबर एजन्सीतील चौघांचे अपहरण केल्याचे अधिका-यांनी मंगळवारी सांगितले. खैबर एजन्सीच्या बारा भागातील शालोबार शांतता समितीच्या कार्यालयावर शस्त्रधारी डझनभर तालिबान्यांनी हल्ला चढवला. अतिरेकी गाढ झोपेत असताना त्यांना ठार करण्यात आले. ज्या तिघांची हत्या करण्यात आली, ते नुकतेच शांतता प्रक्रियेत सहभागी झाले होते.
अतिरेक्यांनी हल्लेखोरांवर गोळीबार केल्यानंतर तालिबानने तिघांचा शिरच्छेद केला आणि चौघांचे अपहरण केले. तालिबान्यांनी तिघांचे शिर रस्त्यालगत टाकले व मंगळवारी रात्री 12.00 पर्यंत ते न उचलण्याची ग्रामस्थांना धमकी दिली. दोन शिर क्वामबराबादच्या शोलाबारमध्ये सापडल्याचे प्रसारमाध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे. कुठल्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. दहशतवादविरोधी धोरणाचा भाग म्हणून पाकिस्तान सरकार व सुरक्षा दल अतिरेक्यांविरोधातील लढ्यासाठी स्थानिक आदिवासींना प्रोत्साहन देत आहे. खैबर पख्तुनख्वा व आदिवासी पट्ट्यातील डझनभर नेत्यांची अतिरेक्यांनी हत्या केली आहे.
पाकिस्तान तालिबानकडून शांतता चर्चेचे स्वागत
प्रतिबंधित तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने(टीटीपी) सरकारच्या शांतता चर्चेचे स्वागत केले असून हा एक शुभ संकेत असल्याचे म्हटले आहे. सरकारने विविध अतिरेकी गटांशी चर्चा करण्याच्या तयारीत आहे.