आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्र प्रकाशनावर तालिबानची तीव्र नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - चार्ली हेब्दोने पुन्हा एकदा महंमद पैगंबरांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल अफगाणिस्तानच्या तालिबानी गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयात गोळीबार करणा-या इस्लामिक कट्टरवाद्यांची तालिबानने प्रशंसा केली आहे.

इंग्रजी भाषेत तालिबानी गटाने आपली प्रतिक्रिया जाहीर केली. ‘चार्ली हेब्दोच्या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हे तिरस्करणीय व अमानवी कृत्य आहे. त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा देणारे मानवतेचे शत्रू आहेत’ या शब्दांत तालिबानी गटाने प्रतिक्रिया दिली आहे. जगातील प्रमुख नेत्यांनी अशा प्रकाशनांचा विरोध करावा, असे तालीबानी गटाने सुचवले.मासिकाच्या कार्यालयावर आक्रमण करण्याची जबाबदारी अल-कायदाने स्वीकारली आहे.