आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगोदर पूर्ण शस्त्रबंदी नंतरच शांतता चर्चा : तालिबान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर - कायमची शस्त्रबंदी झाल्याशिवाय पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत कोणतीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका तालिबान अणि पाकिस्तानमध्ये वाटाघाटी करणार्‍या समितीने घेतली आहे.पाकिस्तानी-तालिबानी यांच्यात वाटाघाटी करणारे एक पथक लवकरच या विषयावर चर्चा करण्यासाठी तालिबानच्या शूरा या समितीची भेट घेणार आहे.

तालिबानमध्ये वाटाघाटी करणार्‍या समितीचे समन्वयक मौलाना युसूफ शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीचे एक पथक लवकरच तालिबानच्या या समितीची बैठक घेऊन शस्त्रबंदीची मुदत वाढवण्याबाबत चर्चा करणार आहे. मात्र कालच तालिबानने आपली भूमिका जाहीर केली असून, 10 एप्रिल रोजी संपलेली शस्त्रबंदीची मुदत वाढ होणार नाही, असे म्हटले आहे.

तालिबान समितीचे अन्य सदस्य प्रोफेसर इब्राहिम खान म्हणाले , पाकिस्तान सरकारने तालिबान्यांच्या काही मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत. या पार्श्वभूमीवर सरकारने गंभीर चर्चा करावी, असे मत त्यांनी मांडले.