आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Gunmen Attack Military School In Peshawar Pakistan

जीवाच्या आकांताने धावणार्‍या चिमुकल्यांवर झाडल्या गोळ्या, वाचा पेशावर हल्ल्याची आपबीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - येथील आर्मी स्कूलवर मंगळवारी दहशतावादी हल्ला झाला. निरागस-निशस्त्र मुलांवर दहशतवाद्यांनी प्रत्येक क्लासमध्ये घुसून गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर जीवाच्या अकांताने धावत सुटलेल्या विद्यार्थ्यांवरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. जोपर्यंत मुले जमीनीवर कोसळत नाहीत, तोपर्यंत दहशतवादी त्यांच्यावर गोळ्या झाडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ते म्हणाले, 'फायरिंग सुरु झाल्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना जमीनीवर झोपण्यास सांगितले. त्यानंतर पोलिस आणि पाकिस्तानी आर्मीने विद्यार्थी आणि शिक्षकांची सुटका केली. शाळेतून बाहेर पडताना आम्ही अनेक विद्यार्थ्यांचे मृतेदेह इकडे-तिकडे पडलेले पाहिले.'
मिलिट्री ड्रिल सुरु असेल
शाळेच्या लॅब असिस्टंटने सांगितले, की दहशतवादी प्रत्येक क्लासरूममध्ये जाऊन फायरिंग करत होते. त्यांच्याकडे मोठ-मोठ्या बंदुकी होत्या. जवळपास एका तासानंतर पाकिस्तानी लष्कराने आमची सुटका केली.
एका मुलाने सांगितले, फायरिंगचा आवाज आल्यानंतर टीचर्स म्हणाल्या, काही नाही मिलिट्रीची ड्रिल सुरु असेल. मात्र, नंतर कळाले सात-आठ दहशतवादी शाळेत घुसले आहेत.

शाळेचे बस ड्रायव्हर जमशेद खान यांनी सांगितले, 'आम्ही बाहेर उभे होतो. अचानक फायरिंगचा आवाज कानावर आला. त्यापाठोपाठ विद्यार्थी आणि टीचर्सचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. सगळीकडे नुसती धावपळ सुरु होती.'
पाकिस्तानचे पत्रकार हनीफ खालिब यांनी सांगितले, शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांनी टाहो फोडला आहे.
का झाला हल्ला
आर्मी स्कुलवरी हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या कट्टरपंथी दहशतवादी संघटनेने घेतली आहे. संघटनेचा प्रवक्ता मोहम्मद खोरसानी यांनी सांगितले, की पाकिस्तानी लष्कराने जर्ब-ए-अज्ब आणि ऑपरेशन खैबर-1 केल्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. तालिबानचा गड असलेल्या भागात पाकिस्तानी लष्कराने वरील दोन्ही अभियान चालवले होते.
जर्ब-ए-अज्ब : सहा महिन्यात 1200 दहशतवादी मारले
पाकिस्तानी लष्कराने उत्तरी वझिरीस्तानमध्ये 15 जूनपासून ऑपरेशन जर्ब-ए-अज्ब सुरु केले आहे. यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कराला 26 अब्ज रुपयांचा निधी दिला आहे. या ऑपरेशनमुळे 10 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले. हा संपूर्ण भाग काबुली आहे. काबुली लोक तालिबानविरोधात पाकिस्तानी लष्कराला मदत करत आहेत. यामुळे तालिबानचे मोठे नुकसान झाले आहे. या ऑपरेशनमध्ये त्यांचे 1200 दहशतवादी मारले गेले आहेत.
या भागात अनेक ठिकाणी दहशतवाद्यांची ठिकाणे उघड झाली आहेत. येथे याआधी 2009 मध्येही सशस्त्र अभियान राबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने डोके वर काढले आहे.
खैबर-1
17 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या ऑपरेशनमध्ये 400 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. या ऑपरेशनचा उद्देश जर्ब-ए-अज्ब मध्ये वाचलेले आणि दुसर्‍या ठिकाणी जाऊन द़डून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणे. यात अनेक दहशतवद्यांनी आत्मसमर्पण केले, तर अनेकांना ठार मारण्यात आले. सध्या हे अभियान 12 तहसील मध्ये सुरु आहे.

पुढील स्लाइडमध्ये, जिवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची छायाचित्रे.....