आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Gunmen Attack Military School In Peshawar

Peshawar Attack: दहशतवादाला धर्म नसतो, पाक लष्कराच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह, वाचा \'Twits\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी असोत अथवा तालिबानी सगळे एकाच माळेचे मणी. दहशतवादाला धर्म नसतो, दशतवाद्यांना माणुसकीही नसते, हे पेशावरमधील लष्करी शाळेत तालिबानींनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पेशावरमधील लष्करी शाळेत तालिबानींनी हल्ला करून निरागस चिमुरड्यांचा बळी घेतला आहे. सहा ते सात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 126 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका जवानासह काही शिक्षकांचाही समावेश आहे. आत्मघातकी दहशतवाद्यांने स्वतःला उडवल्याने सर्वाधिक हानी झाली आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. त्यात अनेकांची प्रकृती ‍चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याशिवाय पाकिस्तानचे लष्कर, गुप्तचर संस्था आणि तसेच सर्च ऑपरेशनच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
शाळेत जवळपास सहा ते सात दहशतवादी घुसले आणि त्यांनी एकच गोळीबार केला. त्यानंतर आत्मघातली हल्लेखोराने स्वतःला उडवून घेतल्याने उपस्थित विद्यार्थ्यांपैकी अनेकांना प्राण गमावावा लागला आहे.

'माझे मत कदाचित चुकीचे ठरेल, त्याबद्दल क्षमस्व. परंतु, या सगळ्यात मोठ्या हल्ल्याने देशाचे लष्कर, गुप्तचर संस्था आणि ऑपरेशन zurb-A-azb च्या कामगिरीवर ‏प्रश्नच‍िन्ह उपस्थित केल्याचे @Naveedrahman याने ट्‍विट केले आहे.'

'आत्मघातकी हल्लेखोरांनी निष्पाप 108 विद्यार्थ्यांनाची निर्घृण हत्या केली आहे. त्या काही शास्त्रज्ञ, चिकित्सक तर इंजीनिअर्स होते.' असे ट्‍विट @IrsaNadeemKhan ने केले आहे.

'मी काही दिवसांपूर्वी लष्करी शाळेच्या परिसरात थांबले होते. हा परिसर पेशावरमधील सगळ्यात सुरक्षित परिसर म्हणून ओळखला जातो. परंतु आता हल्लेखोरांनी परिसरातील शांतता भंग केली आहे.' असे टि्‍वट @Fereeha ने केले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'टि्‍वटर' उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियासह पेशावरमध्ये तालिबानींनी केलेल्या हल्ल्याची भीषणता दर्शवणारे फोटो...