आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Terrorists Attack On Peshwar\'s Army School, Many Students Killed

पाकिस्तानात मुलांचा नरसंहार: डोळ्यांजवळून गोळी गेली, नंतर काळोख..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र : मेहरान। वय जवळपास १५ वर्षे. वर्गात घुसून अतिरेक्यांनी गोळीबार केला तेव्हा याचा डावा कान, उजवी बगल आणि पाठीत गोळ्या घुसल्या. याला रुग्णालयात आणले तेव्हा श्वास घेता येत नव्हता. डॉक्टरांनी गळ्यातून ऑक्सिजनची नळी आत टाकली.)
पेशावर - मंगळवारची सकाळ. थंडी आणि धुक्यामुळे सारेच गारठले होते. एव्हाना लष्करी शाळेजवळ सुमारे १५०० मुले पोहचली होती. दोन-तीन तासही झाले होते. मात्र, दुपारनंतर शाळेतील चित्र पूर्ण बदलले. प्रचंड दहशत, रक्तपात आणि फक्त वेदना... मानवी मने या घटनेने अक्षरश: गोठली. शाळेत १४-१५ वर्षांची मुले एका कार्यक्रमात आनंदाने बागडत असताना तालिबानी अतिरेक्यांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या डागल्या.
एका मुलाने प्रत्यक्ष अनुभव सांगितला, ‘आमची पार्टी सुरू असताना अचानक गोळीबार सुरू झाला. आम्ही तत्काळ बाकांच्या खाली लपलो. मात्र, गोळीबार इतका सुरू होता की दुसरा आवाजच येत नव्हता. माझ्या तर डोक्याजवळून एक गोळी गेली. त्याचा आवाज मी अनुभवला. एवढ्यात माझ्या डोळ्यात काहीतरी गेले. यानंतर काय घडले आठवत नाही....’

मेहरान। वय जवळपास १५ वर्षे. वर्गात घुसून अतिरेक्यांनी गोळीबार केला तेव्हा याचा डावा कान, उजवी बगल आणि पाठीत गोळ्या घुसल्या. याला रुग्णालयात आणले तेव्हा श्वास घेता येत नव्हता. डॉक्टरांनी गळ्यातून ऑक्सिजनची नळी आत टाकली.

पुढे वाचा पाकिस्तानच्या कोणत्या भागात झाला दहशतवादी हल्ला...