आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत तामिळी वृत्तपत्राचे कार्यालय जाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- श्रीलंकेतील तामिळी वृत्तपत्राच्या कार्यालयावर शनिवारी पहाटे सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. एलटीटीईचे वर्चस्व राहिलेल्या उत्तरेकडील जाफना भागातील या कार्यालयात हल्लेखोरांनी तुफानी गोळीबार करून त्याला पेटवून दिले. शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ‘उथयन’ नावाच्या वृत्तपत्र कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तामिळींचे राष्ट्रवादी वृत्तपत्र अशी ‘उथयन’ची ओळख आहे. हल्ला दोन अज्ञात हल्लेखोरांकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हल्लेखोरांनी अगोदर कार्यालयाला आग लावली. त्यानंतर मुद्रण यंत्रावर प्रचंड गोळीबार केला. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत, असे पोलिस विभागाचे प्रवक्ते बुद्धिका सिरिवर्देना यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात 3 एप्रिल रोजी ‘उथयन’च्या किलिनोच्छी येथील वितरण कार्यालयावर असाच हल्ला झाला होता. त्या वेळी सुरक्षा पुरवण्याची विनंती आम्ही केली होती, असे वृत्तपत्राचे मालक इ. सरवानापवन यांनी सांगितले.

लंका नौदलाचा 6 मच्छीमारांवर हल्ला
भारतीय सागरी क्षेत्रातील मच्छीमारांवर शुक्रवारी रात्री श्रीलंकन नौदलाच्या काही जवानांनी हल्ला केल्याची घटना उजेडात आली आहे. कोडिकराई किनार्‍यावर काही श्रीलंकन जवान एका बोटीने दाखल झाले. त्यांनी मच्छीमारांना लोखंडी सळईने मारहाण केली.