आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tax Cheating Proved Then Face Punishment Barlosconi

करचोरीच्या घोटाळ्यात दोषी आढळल्यास शिक्षेला सामोरे जाऊ - सिल्व्हिओ बर्लुस्कोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - करचोरीच्या घोटाळ्यात दोषी आढळल्यास शिक्षेला सामोरे जाऊ, असे इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांनी एका मुलाखतीत सांगितले. बर्लुस्कोनी यांच्या खटल्याची मंगळवारी सुनावणी आहे.


गुन्ह्यात दोषी आढळल्यास मी निर्वासिताचे आयुष्य जगणार नाही. त्याऐवजी गुन्हेगाराप्रमाणे सामाजिक सेवेत सहभागी होईन, असे त्यांनी लिबेरो डेलीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. इटलीच्या सर्वोच्च न्यायालयाकडून कर घोटाळ्यासंदर्भात निकाल येणार आहे, त्यापार्श्वभूमीवर बर्लुस्कोनी यांनी हे मत व्यक्त केले.


इटलीत वयोवृद्ध कैद्यांना घरात नजरकैदेत राहून शिक्षा भोगण्याची तरतूद आहे. आपण या सवलतीचा फायदा घेणार नसल्याचे बर्लुस्कोनी म्हणाले. माझे वय 78 वर्षे आहे, त्यामुळे मला नजरकैदेची शिक्षा भोगण्याचा मला अधिकार आहे. न्यायालयाने मला दोषी ठरवल्यास तुरुंगात जाण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.


एक वर्ष शिक्षा, पाच वर्षे सार्वजनिक जीवनावर बंदी
बर्लुस्कोनी यांच्या खटल्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालय त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि पाच वर्षे सार्वजनिक जीवनातील सहभागावर बंदीची शिक्षा कायम ठेवते काय, याबद्दल उत्सुकता आहे. निकालाच्या विचाराने मला महिनाभरापासून झोप नाही. न्यायाधीश काय निकाल देतील, याचाच विचार मी करत आहे. राजकीय विरोधक या खटल्याच्या माध्यमातून सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप बर्लुस्कोनी यांनी केला.


काय आहे प्रकरण
करचोरी खटल्याची सुनावणी सात वर्षांपूर्वी सुरू झाली. बर्लुस्कोनी यांच्या मीडिया कंपनीच्या पारदर्शकेतबाबत संशय आहे. कर चुकवेगिरी करण्यासाठी त्यांनी बनावट कंपनीद्वारे चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याचा आरोप आहे. राजकारणातील व्यग्रतेमुळे चित्रपट हक्कासारख्या व्यावसायिक बाबींत लक्ष घालायला वेळ नाही, असे सांगत त्यांनी आरोप नाकारले आहेत.