आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tax Fraudulant Non Resident Indian Get 19 Years Jailed

करचुकवेगिरीबद्दल अमेरिकेत अनिवासी भारतीयाला 19 महिने शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारतीय वंशाचा अमेरिकी व्यावसायिक समीर गुप्ताला करचुकवेगिरी प्रकरणात न्यायालयाने 19 महिन्यांची शिक्षा ठोठावली. गुप्ताने सुमारे 7 कोटी 17 लाख 84 हजार रुपये अमेरिकेतील व भारतीय बॅँकांमध्ये दडवल्याचा आरोप आहे. 33 वर्षीय समीर गुप्ता न्यूजर्सीतील एडिसन शहराचा रहिवासी असून तो घाऊक व्यापारी आहे. त्याने भारतातील एचएसबीसी बॅँकेसह अन्य ठिकाणी पैसा वळवल्याची कबुली दिली होती.

समीर आपल्या कंपनीमार्फत अ‍ॅडल्ट सामग्रीची स्टोअर चेन चालवतो. 2006-2009 दरम्यान, त्याने विविध 17 बॅँक खात्यांत पैसे वळवले तसेच भारतातील एचएसबीसी बॅँकेत सहा खात्यांमध्ये 2,50,000 डॉलर जमा केले होते.