आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-सिगारेटवर होताहेत विरोधाभासी दावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई-सिगारेट ओढणार्‍यांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे जितकी 1950 च्या दशकात सिगारेट ओढणार्‍यांची संख्या वाढली होती. 2010 मध्ये दोन टक्के लोग इलेक्ट्रॉनिक सिगारेट पीत होते. 2012 मध्ये ही संख्या वाढून 30 टक्के झाली. खरे म्हणजे, अशा दाव्यांनी इलेक्ट्रॉनिक सिगारेटची लोकप्रियता वाढवली की ही ओढल्याने तंबाखूच्या धुरापासून सुटका होऊ शकते. ब्रिटनमधून अलीकडेच आलेल्या एका अहवालात सांगण्यात आले आहे की, इलेक्ट्रॉनिक सिगारेटमुळे इतर प्रकारे निकोटीन चघळण्यापेक्षा धूम्रपान सोडण्याची शक्यता साठ टक्के अधिक वाढून जाते. तसे अहवालात हेही सांगण्यात आले आहे की, फक्त वीस टक्के त्या लोकांनी धूर काढणे सोडले आहे, ज्यांनी ई-सिगारेटचा वापर केला होता.

अमेरिकेत ई-सिगारेटमुळे धूम्रपान करणार्‍यांचा नवा वर्ग निर्माण होत आहे. हायस्कूलचे विद्यार्थी ई सोबतच तंबाखूची सिगारेटदेखील ओढतात. ई-सिगारेटची जाहिरात अशा लोकांना साद घालते ज्यांनी सिगारेट ओढणे सोडले आहे. निकोटीन घेण्याची त्यांची नशा आणखी जीवघेणी होते. द्रवरूप निकोटीनमधील ई-सिगारेटच्या वाफेत तंबाखूच्या धुरासारखे विषारी घटक नसतात, मात्र त्यात कार्सिनोजेन्ससह हानिकारक घटक आढळतात.

ई-सिगारेटचे अनेक धोके
बॅटरी फुटण्याचा धोका असतो.
ई-सिगारेटचे केमिकल शरीराच्या वायुपेशींमध्ये अँटिबायोटिक्ससाठी प्रतिरोध निर्माण करतात.
ई-सिगारेटच्या वाफेत कार्सिनोजन फॉर्मल्डिहाइड, प्रॉपिलिन ग्लायकॉल आणि निकोटीन असते.
अमेरिकेत विष नियंत्रण केंद्रात ई-सिगारेटसंबंधी मुद्दय़ांवर 2012-2013 दरम्यान 219 टक्के वाढ नोंदवण्यात आली.