आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांचा अ‍ॅश तंत्रज्ञानातील महारथींना शिकवतो छक्केपंजे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञानातील महारथींची चूक लक्षात आणून दिल्यामुळे 16 वर्षांचा तरुण स्टार बनला आहे. त्याने कॉलेजचे शिक्षण सोडले आहे. त्याला मॅकबुक प्रो खरेदी करायचे होते. आई-वडिलांनी सहज परवानगी द्यावी, यासाठी त्याने प्रोग्रामिंगमध्ये स्वत:चे कौशल्य सिद्ध केले. आज तो एवढा पुढे आला आहे की तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना तो त्यांच्या चुका दाखवतो. त्यामुळे अ‍ॅपलच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्सकडून त्याला शिष्टवृत्ती मिळाली आहे. त्याने अ‍ॅपलच्या लक्षात आणून दिले की, सिरीमध्ये युजरला बोलण्यासाठी क्लिक अथवा टच करण्याची गरज नाही. अ‍ॅशने असे सॉफ्टवेअर तयार केले आहे, ज्याद्वारे आयफोन ऑपरेटिंग सिस्टिम फक्त आवाजाच्या आदेशावरून चालवता येईल. हे सॉफ्टवेअर एकदा क्लिक केल्यानंतर युजरचा आवाज एकते. तसेच कीप या अ‍ॅडव्हर्टाइझिंग स्टार्टअप कंपनीला कोडमध्ये एक बग असल्याचे लक्षात आणून दिले. या कंपनीचे संस्थापक ब्रेग वॉँगने त्याला समर जॉबची ऑफर दिली. कीप ही कंपनी मोबाइल गेम खेळताना जाहिरातीसाठी थांबणाºया युजर्सना बक्षीस देते. कोडमधील बगमुळे अनेकांना बक्षिसे द्यावी लागत होती.


14 वर्षांचा असतानाच अ‍ॅशने विविध शाळांसाठी ‘आयस्कूल्ज’ नावाचे एक अ‍ॅप तयार केले होते.
02 मित्रांसोबत अ‍ॅश त्याने तयार केलेल्या अ‍ॅप्लिकेशनचे काम पाहत आहे.
16 हजार विद्यार्थी त्याने बनवलेले अ‍ॅप वापरत आहेत.


theverge