Home | International | Other Country | team anna is political pressure says cia

‘टीम अण्णा’ तर राजकीय दबाव गट : सीआयए

वृत्तसंस्था | Update - Dec 31, 2011, 07:04 AM IST

सीआयए अर्थात अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे व त्यांची ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही संघटना भारतात राजकीय दबावतंत्राचा वापर करत आहेत.

  • team anna is political pressure says cia

    वॉशिंग्टन - सीआयए अर्थात अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे व त्यांची ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही संघटना भारतात राजकीय दबावतंत्राचा वापर करत आहेत. त्यामुळे अमेरिकेने अण्णा हजारे व इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व हुरियत कॉन्फरन्स यांच्या गटात टाकले आहे.
    सीआयएच्या ‘वर्ल्ड फॅक्ट बुक’ मधील पॉलिटिकल प्रेशर ग्रुप अ‍ॅण्ड लीडर्सच्या यादीत अण्णा हजारेंचा समावेश करण्यात आला आहे. सीआयएच्या या यादीनुसार इंडिया अगेन्स्ट करप्शनसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जमियत उलेमा ए हिंद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व हुरियत कॉन्फरन्स या संघटना सरकारवर राजकीयदृष्ट्या दबाव आणतात. यासह भारतात इतरही अनेक धार्मिक संघटना तसेच काही दहशतवादी संघटना कार्यरत असून अनेक संघटना सांप्रदायिक, क्षेत्रीय स्वायत्ततेची मागणी करत आहेत. भारतात राज्य किंवा स्थानिक पातळीवरील अनेक संघटना सामाजिक सुधार, भ्रष्टाचार विरोध तसेच पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहेत. सीआयएच्या संकेतस्थळावर ही माहिती 20 डिसेंबरला टाकण्यात आली आहे.

Trending