आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक अपडेट: वाकड्या वाटेवर जाणा-या मुलांवर नियंत्रण ठेवणारे अ‍ॅप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - स्मार्टफोनच्या माध्यमातून मुले चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत याची चिंता पालकांना नेहमीच असते. ही चिंता आता दूर झाली आहे. कारण मुलांवर नियंत्रण ठेवणारा नवीन अ‍ॅप विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे.
दुबईतील मोबिली कंपनीने गार्डियन अ‍ॅप विकसित केले आहे. त्यासाठी पर्व्हेसिव्ह ग्रुप इंक या आंतरराष्ट्रीय कंपनीचीदेखील मदत घेण्यात आली आहे. पर्व्हेसिव्ह हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सच्या क्षेत्रातील मोठे नाव आहे. अ‍ॅपचा वापर करून पालकांना निश्चिंत होता येऊ शकते. मुलांनी स्मार्टफोनचा योग्य पद्धतीने वापर करावा. त्यांच्यावर अँड्रॉइडमुळे मिळणा-या सुविधेचा वाईट परिणाम होऊ नये, या उद्देशाने त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
‘गार्डियन अ‍ॅप’चा वापर प्रत्यक्ष पाहण्यासाठी ते मोफत डाऊनलोड करता येऊ शकेल. कंपनीकडून ते 14 दिवसांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतर कंपनी सेवा शुल्क आकारू शकते. दरम्यान, पर्व्हेसिव्ह ग्रुप इंक ही कंपनी मूळची क्लिफ्टॉनची (अमेरिका) आहे. कंपनीच्या अनेक उत्पादनांना पुरस्कारदेखील मिळाले आहेत. कंपनीच्या उत्पादनांतून उपकरणाच्या सुरक्षेची हमी मिळते.
व्हॉट्स अ‍ॅपचे युजर
43 कोटींवर!
इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस म्हणून अल्पावधीत युजरप्रिय झालेल्या व्हॉट्स अ‍ॅप वापरणा-यांची संख्या अलीकडेच 43 कोटींवर पोहोचली आहे. स्मार्टफोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज माहितीची देवाण-घेवाण केली जाते; परंतु हा संवादाचा व्यवहार एसएमएसच्या सीमा ओलांडून पुढे गेला आहे. डिसेंबरमध्ये व्हॉट्स अ‍ॅपचा युजर आकडा 40 कोटींवर गेला होता. याचा अर्थ दोन महिन्यांत त्यात 3 कोटी युजर्सची भर पडली.
कसे काम करते?
स्मार्टफोनवर चुकीची माहिती घेतली जात असल्यास पालकांना त्याचा संदेश तत्काळ मिळतो. त्याचबरोबर विशिष्ट काळासाठी स्मार्टफोन मुलांना वापरण्यासाठी देता येऊ शकतो. वापराची तशी वेळ निश्चित केली जाऊ शकते. त्याशिवाय विशिष्ट गोष्टींचा वापर करणे बंद करता येऊ शकते.
मुलांचा अनुभव
मोबाइल वापरताना मुले कशा प्रकारे वागतात, त्याची माहिती पालकांना सविस्तरपणे उपलब्ध करून देणारे अ‍ॅप म्हणूनही त्याचा चांगला वापर केला जाऊ शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.