आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागे पडत चाललेल्या तंत्रातून निघाली 120 अब्ज रुपयांची आयडिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑक्युलस रिफ्टचे महत्त्व समजण्यासाठी आपल्याला जाणून घ्यायला हवे की, जॉन कार्मेक कोण आहे? तुम्हाला भले त्यांचे नाव माहीत नसेल, पण त्यांचे नाव ऐकले तरी असेल. कार्मेक यांनी 1990 दशकाच्या सुरुवातीला थ्री डायमेन्शन व्हिडिओ गेमचे प्रोग्रामिंग केले होते. त्यांनी पहिला वास्तविक थ्रीडी गेम क्वेक बनवला होता. ते अशा माध्यमाचे शिल्पकार आहेत, ज्यांनी गेल्या वीस वर्षांत लोकांना निरंतर मनोरंजनाचा पुरवठा केला आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी पामेर लकीची कंपनी ऑक्युलस रिफ्टची क्षमता ओळखली होती.
26 मार्चला फेसबुकने ऑक्युलस व्हीआरला दोन अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची घोषणा केली. सोशल नेटवर्किंगचे महारथीला या सौद्याने उच्च दर्जाची इंजिनिअरिंग तज्ज्ञ आणि व्हच्यरुअल रियालिटी हेडसेटचे तंत्रज्ञान मिळेल. सौद्यानंतर फेसबुकचे मालक मार्क झकरबर्ग म्हणाले, मोबाइल सध्याच्या काळाचा प्लॅटफॉर्म आहे. आता आम्ही भविष्यातील प्लॅटफॉर्मची तयारी करत आहोत. ऑक्युलस आमच्या काम, मनोरंजन आणि संवादाच्या पद्धती बदलू शकतो. कोणत्याही सोशल नेटवर्कसाठी दोन वर्षे जुनी कंपनी खरेदी करणे साधी गोष्ट नाही. काही काळापूर्वी अपयशी समजली जाणारी व्हच्यरुअल रियालिटी (व्हीआर) वर झकरबर्गवर इतकी उंच बोली लावणे आश्चर्यकारक आहे.
ऑक्युलसचा पाया घालणारे पामेर लकी यांना किशोरवयापासून जुने व्हिडिओ गेम कन्सोल तोडण्या-जोडण्याची आवड होती. व्हीआर त्यांना आवडायचे. तसे, लकीच्या वयाच्या व्यक्तीसाठी अपयशी तंत्रज्ञान व्हीआर आवडणे गंमतच होती. व्हीआर तंत्रज्ञान विज्ञान कादंबरीवर केंद्रित चित्रपट न्यूरोमेन्सर, स्नो क्रॅश, ट्रॉन, स्टार ट्रॅक, द मॅट्रिक्स यांचा प्राण होता. कार डिझाइन व तेलक्षेत्र संशोधनासारखी कामे वगळता व्हीआर बाजारात स्थान मिळवू शकली नाही. या तंत्रज्ञानाशी निगडित संशोधनावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. उडती कार, रोबोट बटलरसारख्या व्हीआर तंत्रज्ञानाने क्रांतीची झलक दाखवली. मात्र, ती पुढे सरकू शकली नाही. 1995 मध्ये निनटेंडोने व्हच्र्युअल बॉय गेम कन्सोल तयार करून कोट्यवधींचा तोटा सहन केला होता.
बाजारात स्थान निर्माण करणारे व्हच्र्युअल रियालिटी प्रॉडक्टची यादी लांबलचक आहे. लकीकडे असे बहुतांश प्रॉडक्ट्स आहेत. त्यांच्याजवळ 40 पेक्षा जास्त व्हीआर हेडसेट आहेत. परंतु, त्यांच्यापैकी एकही चांगल्या पद्धतीने काम करत नव्हता. त्यामुळे त्याने स्वत:च ते बनवणे सुरू केले. व्हच्र्युअल रियालिटीची काळजी करणारा लकी एकटाच नव्हता. जॉन कार्मेकला व्हीआरच्या क्षमतेत विश्वास होता. एप्रिल 2012 मध्ये कार्मेक सोनीच्या व्हीआर हेडसेटशी खेळत होते. त्यांनी गेमिंग साइट एमटीबीएस थ्रीडीवर त्याविषयी शेअर केले. त्यावर लकीने कार्मेकला आपल्या प्रोटोटाइपविषयी सांगितले. कार्मेकने ते खरेदी करण्याची इच्छा दाखवली. लकीने कार्मेकला प्रोटोटाइप नि:शुल्क पाठवले.
लकीचे डिव्हाइस इतर हेडसेटसारखे नव्हते. 2012 मध्ये व्हीआरमध्ये लोकांच्या आवडीचा व्हच्र्युअल सिनेमा निर्मितीपुरता र्मयादित होता. हे असे होते - तुम्ही हेडसेटमध्ये बघा. तुमच्या समोर हवेत एक मोठा पडदा लावलेला दिसेल. तुम्ही त्यावर सिनेमा पाहू शकता. परंतु, बरेच जण असे करत नव्हते. सोनीच्या हेडसेटची किंमत 1000 डॉलर होती. लकीचा डिव्हाइस गेम चालवण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. ते डोक्यात घातले जाते. ते स्कीइंगच्या गॉगलसारखे वाटते. डिव्हाइस वेगाने चालते. त्याचा पाहण्याचा आवाका मोठा आहे. ते लोकांना दुसर्‍या जगात घेऊन जाते. कार्मेकने आपल्या नव्या गेम इंजिनमध्ये लकीच्या हेडसेटचा वापर केला. अशा प्रकारे एक यशस्वी भागीदारी सुरू झाली. जॉन कार्मेकला आपल्या हेडसेटचा प्रोटोटाइप पाठवल्याच्या दोन वर्षांनंतर पामेर लकीने ऑक्युलस व्हीआरची स्थापना केली. कंपनीचे मुख्यालय इरविन, कॅलिफोर्नियामध्ये आहे. 43 वर्षीय कार्मेक कंपनीचे मुख्य तंत्र अधिकारी आहेत. त्यांनी अपली 22 वर्षे जुनी कंपनी आयडी सॉफ्टवेअर सोडली आहे. व्हीआरचे यश सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या मिलाफवर अवलंबून असते. या वळणावर कार्मेकची उपयोगिता समोर येते. त्यांनी तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक शोध लावले आहेत. ब्रँडन इरिबे कंपनीचे सीईओ आहेत. आता ही टीम फेसबुकसोबत आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा फेसबुकने कोणत्‍या कंपन्या खरेदी केल्या