आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्नोबबलमुळे पुरुषांची जास्त भंबेरी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सध्याचे तांत्रिक शब्दजाळ किंवा तांत्रिक भाषा (टेक्नोबबल) समजण्यापेक्षा एखादी परकीय भाषा शिकणे खूपच सोपे असल्याचे बहुतांश प्रौढांना वाटते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना तांत्रिक भाषेचे अन्वयार्थ चटकन लक्षात येतात. तांत्रिक पारिभाषिक शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी त्या कायम धडपडत असतात, असे अभ्यासात आढळून आले. मिनलँड लॅबच्या संशोधकांनी 16 जणांवरील विविध वाक्प्रचाराच्या मेंदूतील इलेक्ट्रिकल ध्वनी तरंग आणि समरूपता याचे मापन करून हे निष्कर्ष काढले आहेत. परकीय भाषेच्या तुलनेत तांत्रिक शब्दावली ऐकताना सरासरी 42 टक्के प्रौढांमध्ये तणाव आढळून आला. परकीय भाषा समजून घेण्यापेक्षा नवीन गॅजेटच्या माहितीचे बुकलेट वाचताना खूपच अडचण होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

समजले नाही की गडबड-गोंधळ
जेव्हा एखादी बाब आपणाला समजत नाही तेव्हा आपणास नैराश्य येते. आपण भावनिक होतो. गोंधळ आणि तणावाची पातळी पटकन वाढते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण अधिक उत्तेजित होतो.
डॉ. डेव्हिड लेव्हिस, न्यूरोसायकॉलॉजिस्ट

गोंधळात टाकणारे वाक्प्रचार
‘रिबूट’ (डिजिटल उपकरण पुन्हा सुरू करणे), ‘मेगाबाइट’ (डिजिटल मेमरीचे मापक) आणि ‘आयएसपी’(इंटरनेट सेवा प्रदाता) हे शब्द ‘बोलँगरी’ (फ्रेंचमध्ये बेकरी), ‘कालिनिचट’ (ग्रीकमध्ये गुडनाइट) आणि ‘ओस्ट्रोव्हिया’ (रशियन भाषेत चिअर्स) या शब्दांपेक्षाही खूपच गोंधळवून टाकणारे असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.
पुरुषांपेक्षा महिला ब-या
तांत्रिक शब्दावली कानावर येताच महिलांच्या तुलनेत पुरुष खूपच गोंधळून जातात. त्यांच्या तणावाची पातळी वाढते. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये ही पातळी 80 टक्क्यांनी अधिक असते. महिला तांत्रिक शब्दावली समजून घेण्याचा कायम प्रयत्न करतात, त्यामुळे तणावाखाली न येता त्या धडपड करतात, असे या अध्ययनात आढळून आले आहे.