आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळणीतील बंदुकीने मुलाने बँक लुटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - खेळणीतील बंदुकीने बँकेवर दरोडा टाकला, असे सांगितले तर विश्वास बसणार नाही, परंतु जर्मनीत एका 16 वर्षीय मुलाने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले.

दक्षिण जर्मनीतील बॅड फ्यूएसिंगमधील बावारियन शहरातील बँकेला लुटण्यात आले. सदर मुलाने बँकेत लूट केल्यानंतर ऑस्ट्रियात पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमेवर पोहोचण्याच्या अगोदरच त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. बंदुकीचा धाक दाखवून या मुलाने पैशांची मागणी करताच बँकेच्या घाबरलेल्या कर्मचार्‍यांनी लगेच रक्कम हाती ठेवली. विशेष म्हणजे पैसे घेऊन या मुलाने सायकलवरून धूम ठोकली, असे कारने पाठपुरावा करणार्‍या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आपण बँक लुटण्यासाठी खेळणीतील बंदुकीचा वापर केल्याचे त्याने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीजबाबात नमूद केले आहे. त्याचे कृत्य पाहून पोलिसही चक्रावून गेले.