आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोरवयीनांच्या आजारांचे कारण डिप्रेशन : डब्ल्यूएचओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सामान्यपणे किशोरावस्थेतील बालकाची विचारक्षमता अधिक नसते असे म्हटले जाते. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) ताज्या अहवालाने ही बाब फेटाळली आहे. किशोरावस्थेतील बालकांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम डिप्रेशन (तणाव) चा होतो. या वयातील कोणत्याही आजाराचे आणि अपंगत्व तसेच आत्महत्येमागील कारण त्यांच्यावरील तणाव असतो, असे डब्ल्यूएचओच्या अहवालात म्हटले आहे.
बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष : जागतिक आरोग्य संघटनेचा हा अहवाल जगभरातील दहा ते वीस वष्रे वयापर्यंतच्या किशोरवयीन बालकांच्या आरोग्यावरून तयार करण्यात आला आहे. डब्ल्यएचओच्या कुटुंब, महिला आणि बाल आरोग्य विभागाच्या प्रमुख फ्लेव्हिया बुस्ट्रियो यांच्या मते, जगभरात बालकांच्या आरोग्याकडे आवश्यक त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही.

14 व्या वर्षी दिसू लागतात लक्षणे
मानसिक आजाराने ग्रस्त असणार्‍या लोकांमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षीच संबंधित आजाराची लक्षणे दिसू लागतात. जर त्यावर वेळीच लक्ष दिले तर मानसिक आजारांमुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.