जॉर्जिया - अमेरिकेचा जवान टॅमूर डियडिनीने( वय 22) पुश-अपचा विक्रम बनवला आहे. त्याने 38 सेकंदांमध्ये 36 पुश-अप काढली. टॅमूरचे यश हे अमेरिकेत 'स्टोरी ऑफ होप' बनले आहे. आगस्ट 2011 मध्ये अफगाणिस्तानमध्ये ड्यूटीवर असताना त्याने आयइडी स्फोटात आपले दोन्ही पाय गमावले होते. पुश-अपचा विक्रम रविवारी(ता.3)अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयांने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बनवला.
विक्रम
आपले शारीरिक दुर्बलता टॅमूरसाठी एक ताकद बनली आहे. त्याने अॅम्प्युटी कॅटेगिरीमधील प्लँच पशु-अप प्रकारात विक्रम बनवला आहे. या प्रकारात पाय हवेत तरंगत ठेवून पुश-अप काढावी लागतात.