आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात \'अग्नि-2\'ची यशस्वी चाचणी, उत्तर कोरिया करू शकतो अमेरिकेवर सायबर हल्ला?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन/प्योंगयांग/सिओल- कोरियामध्ये युद्धाचे ढग जमले असताना भारताने रविवारी 'अग्नि-2' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातील लष्करी तळावरून अण्वस्त्रवाहू 'अग्नी-2' या स्ट्रॅटेजिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.

दुसरीकडे उत्तर कोरियानेही क्षेपणास्त्र चाचणी करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जपानची चिंता वाढली आहे. परंतु जपानच्या दिशेने येणारे कोणतेही क्षेपणास्त्र पाडण्याचा आदेश जपान सरकारने लष्काराला दिले आहेत.

जपानमध्ये 'योमिऊरी' वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचणी करण्यासाठी सज्ज झाल्याचे संकेत मिळाले असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जपानचे संरक्षणमंत्री इत्सुनोरी ओनोडेरा यांनी यासंदर्भात लष्कराला आदेश दिले आहेत. जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली बसविण्यात येणार असल्याचे ओनोडेरा यांनी सांगितले आहे.

उत्तर कोरिया अमेरिकाविरोधात अण्वस्त्र हल्ला करू शकत नाही. कारण उत्तर कोरियाकडे अजून इतकी ताकद नसल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. परंतु उत्तर कोरियाकडून अमे‍रिकेवर सायबर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेवर सायबर हल्ला चढवून उत्तर कोरिया अमेरिकेतील संगणकीय यंत्रणा उद्‍धवस्त करू शकते.