आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराची एअरपोर्टजवळ पुन्हा हल्ला, 5 जण ठार; दहशतवादी झाले फरार, शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टच्या जवळ आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. कराचीच्या एअरपोर्ट सेक्युरिटी फोर्स (एएसएफ) च्या कँपवर हा हल्ला झाला आहे. याठिकाणी एएसएफचे कमांडो आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. गेल्या तीन दिवसांत कराचीमध्ये झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याठिकाणी 10 दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 5 जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याठिकाणी पाकिस्तानच्या सेनेला पाचारण करण्यात आले होते. हा हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
हल्ला झालेले ठिकाणी एअरपोर्टपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार या परिसरात एएसएफचे रडारही आहेत. त्यालाच लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी आले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणझे रविवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात, सर्व विमाने उद्धवस्त करण्यासंबंधीचा उल्लेख होता. एएसएफ कमांडो आणि दहशतवाद्यांमध्ये काही काळ फायरिंग झाल्यानंतर मात्र गोळीबाराचा आवज बंद झाला. एअरपोर्टमध्ये 1000 पोलिस कर्मचा-यांनी पाठवण्यात आले आहे. हेलिकॉप्टरद्वारे दहशतवाद्यांचा तपास सुरू करण्यात आला असून विमानतळ परिसरात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. काही काळ उड्डाणे रद्द केल्यानंतर हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा उमर खोरासानी याने एखा ट्वीटर अकाउंटवरून एक ट्वीट करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. "कराची एएसएफ अकादमी में हम फिर आ गए" असे त्याने ट्वीट केले आहे.
हल्ल्यासंबंधीचा घटनाक्रम
1.11 वाजता : कराची एअरपोर्टच्या सेक्युरिटी फोर्स कँपमध्ये 8-10 दहशतवादी घुसल्याचे सुत्रांनी सांगितले.
1.09 वाजता : पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आदेश दिला.
1.03 वाजता : सेक्युरिटी फोर्स वर हल्ला करण्यासाठी दहशतवादी कँपच्या आत लपलेले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
12.51 वाजता : एएसएफ अकादमीमध्ये घुसण्याचे तीन रस्ते आहेत. 'लेडी हॉस्टल' गेटमधून ते आत घुसले.
12.50 वाजता : इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन ने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण केल्याची माहिती दिली.
12.45 वाजता : सुरक्षा अधिकारी, पोलिस आणि रेंजर्स यांना कॉम्बॅट ओपरेशनचे आदेश दिले.
पुढील स्लाईड्सवर पाहा फोटो...