आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराचीत पुन्हा हल्ला; जिना विमानतळावर दहशतवाद्यांचा उच्छाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करून 40 जणांना ठार केल्याच्या घटनेनंतर दुसर्‍याच दिवशी तालिबानी दहशतवाद्यांनी मंगळवारी एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्सच्या तळावर हल्ला केला. सुदैवाने त्यात प्राणहानी झाली नाही.

विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या तळ क्रमांक-2 येथे दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. बिताई अबाद येथे एएसएफ अकादमीला लक्ष्य केले. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील सोमवारच्या धुमश्चक्रीनंतरचा हा आणखी मोठा हल्ला ठरला. सकाळी दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून लष्करी तळाच्या परिसरात घुसले. त्यांनी महिला एएसएफ सैनिकांवर गोळीबार केला. त्याच वेळी आमच्या जवानांनी तत्काळ सज्ज होत त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे ते दोघे दहशतवादी पळून गेल्याचे सांगण्यात आले. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. निमलष्करी दल व पोलिस यांनी परिसरात जोरदार तपास मोहीम राबवली. परंतु त्या दहशतवाद्यांचा शोध लागू शकलेला नाही. पाकिस्तानी लष्कराने हेलिकॉप्टरच्या साह्याने या भागावर निगराणी सुरू केल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अमेरिकेने कराचीतील हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानला मदत देऊ केली आहे. हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असे परराष्ट्र विभागाच्या उपप्रवक्त्या मेरी हार्फ यांनी म्हटले आहे.