आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack In China's Xinjiang Region, Divya Marathi

चीनमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, 12 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - इस्लामी कट्टरपंथीयांच्या हल्ल्यात चीन येथील जिनजियांग प्रांतातील 12 नागरिक ठार झाले. पोलिसांनी या हल्लेखोरांचा मुकाबला करण्यासाठी गोळीबार केला. यात काही दहशतवादी ठार झाले. हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
जिनजियांग प्रांतात यिगूर मुस्लिमांचे बाहुल्य आहे. हे मूळचे तुर्की भाषक आहेत. अल कायदाकडून इस्ट तुर्कस्तानी इस्लामिक मूव्हमेंटला शस्त्रास्त्र पुरवठा होतो. एक वर्षापासून चिनी लष्कर या कट्टरपंथीयांशी लढा देत आहे. जिनजियांग प्रांत पाकव्याप्त काश्मीरनजीक आहे.