आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी हल्ल्यात मृत्यूंचे प्रमाण ६१ टक्क्यांनी वाढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगभरातील दहशतवादी कारवायांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत २०१३ मध्ये ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीसने केलेल्या सर्वेक्षणात ही टक्केवारी समोर आली आहे. बोको हरम इस्लामिक स्टेट जिहादीस्टचे वाढते प्रस्थ यास कारणीभूत असल्याचे या अध्ययनात म्हटले आहे. लंडन येथे २०१४ ग्लोबल टेररिझम इंडेक्स’चे प्रकाशन करण्यात आले. २०१३ मध्ये १० हजार दहशतवादी हल्ले झाले असून ही संख्या २०१२ च्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढली आहे. यात १७ हजार ९५८ लोकांचा मृत्यू झाला. हीच संख्या २०१२ मध्ये ११ हजार १३३ होती. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नायजेरिया सिरियातील मृतांचा यात समावेश आहे. इराकमध्ये बळींची संख्या सर्वाधिक आहे. एकूण मृत्यूत ६६ टक्के बळी हे बोको हरम, अल कायदा, तालीबान आयएसच्या कारवायातील आहेत.