आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack On Magazine Office In Paris 12 Dead, Latest News In Marathi

पॅरिसमध्ये ‘शार्ली हेब्दो’ साप्ताहिकाच्या कार्यालयावर अतिरेकी हल्ला, १२ जण ठार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्सचे उपहासात्मक साप्ताहिक "शार्ली हेब्दो'च्या पॅरिसमधील कार्यालयावर बुधवारी दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांत साप्ताहिकाचे मुख्य संपादक स्टीफन चार्बोनियर यांच्यासह तीन विख्यात व्यंगचित्रकार, १० पत्रकार आणि दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. इतर १२ जण जखमी झाले आहेत.

काळ्या कपड्यांत आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता हल्ला केला. यानंतर ‘आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेतला आहे, मीडियाला सांगा की आम्ही अल कायदा येमेनचे आहोत' अशा घोषणा देत त्यांनी पळ काढला. अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हल्ल्याच्या वेळी कार्यालयात संपादकीय बैठक सुरू होती. मृतांत फ्रान्सच्या ४ प्रख्यात व्यंगचित्रकारांचाही समावेश आहे. महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र छापल्याबद्दल हेब्दोवर यापूर्वीही अनेकदा हल्ले झालेले आहेत. २ नोव्हेंबर २०११ रोजी इमारतीवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते. यामुळे इमारत पूर्णपणे भस्मसात झाली होती. तेव्हा कार्यालयात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली होती.
फ्रान्समध्ये ५० वर्षांतील सर्वात मोठा अतिरेकी हल्ला
फ्रान्सचे गृहमंत्री दोन किंवा तीन हल्लेखोर असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षदर्शींनुसार त्यांची संख्या दोन होती. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही दोन बुरखेधाऱ्यांना आत जाताना पाहिले. त्यांच्या हातात एके रायफल व मशीनगन होती. त्यानंतर आतून गोळीबाराचा आवाज आला. आम्ही सर्व छतावर पळालो.

अतिरेकी हल्लाच :राष्ट्राध्यक्ष ओलांद
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी ही घटना अतिरेकी हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. हा फ्रान्समध्ये गेल्या ५० वर्षांतील पहिलाच सर्वात मोठा हल्ला आहे.
विडंबनासाठी प्रसिद्ध आहे ‘शार्ली हेब्दो’
* हे साप्ताहिक इस्लामच्या थट्टेसाठी कुख्यात समजले जाते.
* एकदा तर महंमद पैगंबर आपले अतिथी संपादक असल्याचे सांगितले होते. दुसऱ्या वेळी साप्ताहिकाचे नावच ‘शरिया हेब्दो’ असे ठेवले होते.
* डॅनिश व्यंगचित्रकार कुर्त वेस्टरगार्ड यांनी काढलेली "कुख्यात' व्यंगचित्रे छापल्यानंतर २००६ पासून साप्ताहिक वादात सापडले. मध्य-पूर्व देश व पाश्चिमात्य शहरांत त्यांचा प्रचंड विरोध झाला होता.
* जगभर २०१२ मध्ये पैगंबरांच्या व्यंगचित्रावरून झालेल्या निदर्शनांच्या सद‌्भावनेदाखल ती हेतुत: पुन: छापली.
* २०१३ मध्ये कार्टून बुकलेटमध्ये पैगंबरांना निर्वस्त्र बाळाच्या रूपात व्हीलचेअरवर दाखवले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मृत व्‍यंगचित्रकारांविषयी