आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Kills More Than 40 People In Kenya Mall

PHOTOS: केनियात दहशतवाद्यांचा हल्‍ला, गैरमुस्लिम लक्ष्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केनियाच्या राजधानीतील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी दहशतवादी हल्ल्यात 39 जण ठार, तर 50 जण जखमी झाले. मृतकांमध्‍ये 2 भारतीयांचाही समावेश आहे. मृतकांचा आकडा वाढण्‍याची भीती असून मॉलच्‍या आत आणखी मृतदेह असण्‍याची शक्‍यता आहे. हल्‍लेखोरांनी मॉलमधून सर्वप्रथम मुस्लिमांना बाहेर काढले. त्‍यानंतर इतरानां गोळ्या घातल्‍या. लष्‍कराने दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात एक हल्‍लेखोर ठार झाल्‍याची माहिती मिळाली आहे.

नैरोबीच्‍या मॉलमध्‍ये ही घटना घडली. अचानक दहाहून अधिक दहशतवादी मॉलमध्ये घुसले. मुस्लिम आहेत ते बाहेर व्हा, आम्ही केवळ गैरमुस्लिमांना मारण्यासाठी आलो आहोत, असे सांगून बंदूकधार्‍यांनी अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांकडे एके-47 तसेच हातगोळे होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्लेखोरांनी अनेक नागरिकांना ओलिस ठेवले. त्यांना सोडवण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दहशतवाद्यांनी नेमके किती जणांना ओलिस ठेवले आहे, याची माहिती मात्र स्पष्ट होऊ शकली नाही.

सविस्‍तर बातमी आणि घटनेची छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...