आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorists Arrested On Suspicion Of Involvement In Mh370 Disappearance

MH370 च्या अपहरणाच्या चर्चांना जोर, अल-कायदाचे ११ संशयीत दहशतवादी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - मलेशियाच्या MH370 या बेपत्ता विमानाच्या तपासादरम्यान ११ संशयीत दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व अल-कायदा या संघठनेचे दहशतवादी असल्याचे बोलले जात आहे. क्वाललंपूर आणि मलेशियाच्या उत्तर सीमेवरील केडा राज्यात या सर्वांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विमान बेपत्ता होण्यामागे दहशतवादी कारस्थान असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर चढला आहे. या विमानाच्या अपहरणात अल-कायदाच्या दहशतवाद्यांचा हात असण्याचा अंदाज आहे.

अटक करण्यात आलेल्या या सर्व दहशतवाद्यांचे वय 22 ते 55 वर्षांदरम्यान आहे. काउंटर टेरेरिस्ट डिव्हीजन ऑफ मलेशियन स्पेशल ब्रँचच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार MH370 च्या बेपत्ता होण्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळेच संशयीतांना अटक करून चौकशी केली जात असल्याचे ते म्हणाले. अधिका-याच्या मते, दहशतवादी या विमानाचा मार्ग बदलू शकतात. त्यामुळे या मुद्याचा विचार करून चौकशी केली जात आहे.

२३९ प्रवाशांना घेऊन क्वालालंपूर येथून बिजींगकडे निघालेले हे विमान 8 मार्च रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर या विमानाचा शोध घेण्यासाठी जगभरातून प्रयत्न झाले. पण त्याला यश आले नाही.

अटक करण्यात आलेल्या संशयीतांची चौकशी सध्या सुरू आहे. त्यांनी मलेशियावर हल्ल्याची तयारी केल्याचे या चौकशीत समोर आले आहे. मात्र, विमान अपहरणाशी आपला संबंध नसल्याचे संशयीतांचे म्हणणे आहे.
रशियाच्या वृत्तपत्राने विमान कंधहार असल्याचा केला होता दावा
काही दिवसांपूर्वी रशियाच्या मास्कोविक्सी कोस्मोलेत्स या वृत्तपत्राने विमानाचे अपहरण करून ते अफगाणिस्तानात उतरवल्याचा दावा केला होता. सुत्रांच्या माहितीच्या आधारावर हे वृत्त देण्यात आले होते.
पुढे वाचा : लादेनच्या जावयाने दिले अपहरणाचे संकेत