मोनॅको - दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या तरुणांवर सूक्ष्म निगराणी ठेवली जात आहे. तरीही सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी देऊन भरकटलेले तरुण या मार्गावर जातच आहेत. आता त्यासाठी त्यांनी आणखी एक अफलातून मार्ग शोधून काढला आहे. महागड्या क्रूझ शिपमधून अनेक तरुण सिरिया व
इराकमध्ये दहशतवादी कारवायांत सहभागी होण्यासाठी किंवा त्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात आहेत. मोनॅको येथे झालेल्या इंटरपोलच्या ८३ व्या महासभेत याबाबत खुलासा करण्यात आला आहे. इंटरपोलचे प्रमुख रोनाल्ड नोबल यांनी सांगितले की, क्रूझमधून मोठ्या संख्येने तरुण तुर्कस्तानकडे जात आहेत. इंटरपोलच्या ढोबळ अंदाजनुसार सिरिया,
इराकमध्ये इस्लामी स्टेटसोबत जोडल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या १६ हजारांपेक्षा जास्त आहे. सुमारे ८१ देशांमधून ते येथे पोहोचले आहेत. यात सर्वाधिक ३०० लढावू तरुण चीनमधून आलेले असून त्यांची संख्या वाढतच आहे.