आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजेच्या प्रत्येक युनिटचा येथे ठेवला जातो हिशेब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी ऑस्टिनमध्ये डेन मॅकएटी आणि लारा स्पूरचे वीजबिल गेल्या वर्षी 37, 800 रुपये आले होते. ऑस्टिनमध्ये सरासरी वीज बिल 60 हजार रुपये येते. त्या दृष्टीने ते अधिक नाहीये. खरे म्हणजे, डेन आणि लाराच्या घराच्या छतावर सोलर एनर्जी पऐनेल लावलेले आहे. त्यासोबतच त्यांच्या घरात विजेच्या खर्चाच्या एकेका मिनिटाचा हिशेब असतो. फ्रिज, संगणक, टीव्ही आणि बल्ब चालल्यावर खर्च होणार्‍या विजेचा तपशील संगणकात नोंदवला जातो. त्यामुळे विजेच्या बिलावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. रिसर्च ग्रुप पेकन स्ट्रीट इनकॉर्पोरेटेडच्या प्रोजेक्टमुळे हे शक्य झाले आहे. ऑस्टिनच्या म्युलर भागात शेकडो कुटुंबे आपल्या घरातील विजेच्या खर्चावर लक्ष ठेवण्याच्या योजनेचा भाग बनले आहेत. संशोधक पाहत आहेत की, म्युलरचे लोक कोणत्या वेळी किती वीज वापरतात.

हेदेखील पाहिले जाते की, सोलर पॅनलशी जोडलेले त्यांचे घरगुती डिव्हाइस आणि इलेक्ट्रिक कारांच्या विजेच्या ग्रीडवर काय परिणाम होतो. पेकन स्ट्रीट प्रोजेक्टचे डिव्हाइस स्मार्ट मीटरपेक्षा स्मार्ट आहेत. स्मार्टमीटर तासाला खर्च होणारी वीज नोंदवते. देशात या क्षणी चार कोटी स्मार्ट मीटर सुरू आहेत. पेकन प्रोजेक्टच्या डिव्हाइसमध्ये हवामानाचा विजेवर परिणाम, दिवसाच्या कोणत्या वेळी कमी जास्त वीज खर्च होते, कराच्या चढ-उतारासारख्या बारीक-सारीक गोष्टींची नोंद होते.