आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये खत कारखान्यात स्फोट, 15 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन- अमेरिकेत टेक्सास प्रांतातील वॅको शहरात बुधवारी एका फर्टिलायझर्स कारखान्यात भीषण स्फोट झाला. त्यात किमान पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे तर 160 हून अधिक जखमी झाले. त्यातील 38 जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेत 70 जण ठार झाले आहेत, असा दावा मीडियातील वृत्तातून करण्यात आला आहे. स्फोटामुळे परिसरातील 50 घरे जमीनदोस्त झाली आहेत. रिश्टर स्केलवर स्फोटामुळे निर्माण झालेल्या कंपनाची तीव्रता 2.1 एवढी होती. स्फोटाचा आवाज 71 किलो मीटरपर्यंत ऐकू आला होता.