आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमध्ये लष्करी बंडाविरुद्ध जनक्षोभ, ‘गेट आऊट’च्या घोषणा देत हजारो नागरिक रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - लष्कराकडून देण्यात आलेल्या इशार्‍याला न जुमानता रविवारी थायलंडमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. संतप्त निदर्शकांनी लष्करी राजवटीला उद्देशून ‘गेट आऊट, गेट आऊट’ अशा घोषणा देत राजधानी दणाणून सोडली.
बँकॉकच्या अत्यंत वर्दळ असलेल्या बाजारपेठेतून नागरिकांनी ही निदर्शने केली. एक हजाराहून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी लष्करी जवान तैनात असतानाही नागरिकांनी निडरपणे ‘गेट आऊट, गेट आऊट’ च्या घोषणा दिल्या. शहरातील स्कायट्रेन भागातील रस्ते सैनिकांकडून बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाकडे जाणार्‍या दोन किलोमीटर मार्गालाही बंद करण्यात आले होते. निदर्शनाचा अंदाज घेऊन लष्कराने संपूर्ण बँकॉकमध्ये सैनिकांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या 100 हून अधिक नेत्यांची चौकशी करण्याची कृती योग्य असल्याचे लष्कराने ठामपणे म्हटले आहे. माजी पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांच्यासह मोठय़ा नेत्यांचा समावेश आहे.
थायलंडमधील लोकशाहीतील शेवटची संस्था मानल्या जाणार्‍या सिनेट सभागृहाला लष्कराने बरखास्त करण्याचा निर्णय शनिवारी घेतला होता. 150 सदस्यीय सभागृहाचे कामकाज आता पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे अराजकाला सुरुवात झाल्याच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अमेरिकेचा संयुक्त लष्करी सराव
अमेरिकेने थायलंडला दिला जाणारा निधी पूर्णपणे बंद केला आहे. त्याचबरोबर संयुक्त लष्करी सरावाचा कार्यक्रमदेखील रद्द केल्याचे जाहीर केले आहे. थायलंडच्या इतिहासातील ही 12 वी लष्करी राजवट ठरली आहे. लष्करी सरावासाठी थायलंडकडे अमेरिकेचे 30 लाखांहून अधिक लष्कर रवाना होणार होते. परंतु त्यांना थांबवण्यात आले आहे. 26 मे पासून हा कार्यक्रम सुरू होणार होता. देशातील ही स्थिती तत्काळ बदलून लोकशाहीची स्थापना करण्याची मागणी अमेरिकेने केली आहे.

दक्षिण भागात बॉम्बस्फोट, 2 ठार
थायलंडच्या दक्षिणेकडील नागरी वस्तीमध्ये रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 2 ठार, तर 52 जखमी झाले. दक्षिणेकडील प्रदेशाला नेहमीच बंडखोरी गटाच्या हिंसाचाराचा मुकाबला करावा लागतो. या भागात नऊ स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.
खबरदार! सहभागी व्हाल तर.
लष्करी राजवट लागू झाल्यापासून नागरिकांमध्ये लष्कराच्या या कृतीबद्दल राग निर्माण झाला होता. तेव्हापासूनच संतप्त नागरिक रस्त्यावर उतरू लागले होते. गुरुवारी मोठय़ा प्रमाणात आंदोलन झाले होते. त्यानंतर रविवारी राजधानीत हे संतप्त चित्र पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख प्रयुथ चान-ओछा यांनी नागरिकांना इशारा दिला होता. नागरिकांनी निदर्शनात सहभागी होऊ नये. सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीच्या तत्त्वांची अंमलबजावणी करता येणार नाही, असे लष्करप्रमुखांनी म्हटले