आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमध्‍ये हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थाई सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून सोमवारी( ता.17) झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्‍ये आर्मी कमांडर आणि इतर आठ सैन्य होते, असे थाई सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले. अद्याप दुर्घटनेचे कारण समजलेले नाही. तसेच मृतांची ओळख पटलेली नाही, असे प्रवक्ते व‍िनथाई सुवरी यांनी सांगितले.
हेलिकॉप्टरने लष्‍कराच्या पायओ प्रांतातून आकाशात उड्डाण घेतल्यानंतर 10 मिनिटातच खाली कोसळले. पायओ येथील पाहणी संपून उत्तरेकडील प्रांताकडे हेलिकॉप्टर निघाले होते.