आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thailand: File Chargsheet Against Yinluk Shinwatra, Agitators Demand

थायलंड : यिंगलूक शिनवात्रा यांच्याविरोधात राष्ट्रद्रोह खटला भरा, आंदोलकांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडमधील सरकारविरोधी निदर्शकांनी आता शिनवात्रा परिवारासच सत्तेबाहेर व राजकारणाबाहेर हाकलण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांना राजीनामा देण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यिंगलूक यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
शिनवात्रा परिवाराचे कडवे समर्थक मानले जाणारे ‘रेड शटर््स’चे लोकही आता मैदानात उतरले आहेत. शिनवात्राविरोधक हिंसक झाल्यास रेड शर्ट्सच त्यांचा मुकाबला करतील, असे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते व माजी उपपंतप्रधान सुथेप थाकसुबेन यांनी सरकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करणा-या समर्थकांना उद्देशून भाषण केले. त्या वेळी यिंगलूक यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवा, असे आदेश पोलिसांना दिल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी आपले आदेश मानले नाहीत, असे ते म्हणाले.
राजीनामा न दिल्यास आंदोलन तीव्र : यिंगलूक यांनी 24 तासांच्या आत राजीनामा न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण शिनवात्रा परिवार देशाबाहेर जाईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे सुथेप यांनी सांगितले.
ग्रामीण भागात शिनवात्रांना पाठिंबा : शिनवात्रा परिवाराला ग्रामीण भागात पाठिंबा आहे. त्यांचे थोरले बंधू थाकसिन यांना ग्रामीण जनता अजूनही आपले दैवत मानते. थाकसिन यांना सन 2006 मध्ये लष्कराने पदच्यूत केले होते. ते आता परदेशात स्थायिक झाले आहेत. सन 2011 मध्ये थाकसिन यांच्या भगिनी यिंगलूक प्रामुख्याने ग्रामीण भागातील मतांवरच निवडून आल्या होत्या.
त्यांनी दोन फेब्रुवारी रोजी निवडणुकीची घोषणा केली आहे. परंतु निवडणुकीत पुन्हा यिंगलूक जिंकण्याची विरोधकांना धास्ती असल्याने त्यांनी निवडणुकीसही विरोध केला आहे.