आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thailand Former Prime Minister Abhisit Vejjajava Guilty In Murder Case

थायलंडचे माजी पंतप्रधान अभिसित वेज्जाजीवा हत्या प्रकरणात दोषी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅँकॉक - थायलंडचे माजी पंतप्रधान अभिसित वेज्जाजीवा यांना हत्याप्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. तीन वर्षापूर्वी बॅँकॉकमध्ये विरोधकांनी केलेल्या निदर्शकांदरम्यान हिंसाचार उसळला होता. यात 90 नागरिक ठार, तर 1900 जखमी झाले होते.
अभिसित यांच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांना पायउतार करण्यासाठी आंदोलन तीव्र केले आहे. यादरम्यान अभिसित यांना हत्याप्रकरणात दोषी ठरवल्याने राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. अभिसित यांनी आरोप फेटाळले असून 56 हजार डॉलरच्या जामिनानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पुढील वर्षी 24 मार्च रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे, अशी माहिती अभिसित यांचे वकील बंडिट सिरिपन यांनी दिली.
० 2010 मध्ये थाकसिन समर्थक ‘रेड शर्ट’धारी निदर्शकांवर सुरक्षा दलाने गोळीबार केला होता. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते अभिसित न्यायालय परिसरात येताच त्यांच्या विरोधकांनी खुनी, खुनी अशा घोषणा दिल्या.
० लष्कराने थाकसिन यांना 2006 मध्ये बडतर्फ केल्यानंतर थायलंडमध्ये अनेकदा राजकीय संघर्ष उफाळला आहे. 2010 मधील आंदोलनावेळी अभिसित व उपपंतप्रधान सुथेप थॉँगसुबन यांच्या आदेशामुळेच सुरक्षा दलाने निदर्शकांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे.