आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडवर लष्कराची पकड आणखी मजबूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक- आणीबाणी लागू केल्याच्या दोन दिवसांनंतर लष्करशाही लादल्यानंतर थायलंडवर लष्कराने पोलादी पकड निर्माण केली आहे. शुक्रवारी लष्कराने माजी पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांच्यासह संपूर्ण माजी मंत्रिमंडळातील सदस्यांना बैठकीला हजर राहण्याचे फर्मान सोडले होते. त्यानुसार शिनवात्रा यांना हजर राहावे लागले.

लष्करप्रमुख प्रायुत चान-ओचा यांनी यिंगलूक यांच्यासह 155 नेत्यांना हे फर्मान पाठवले. देशात राजकीय अस्थिरता संपुष्टात यावी, यासाठी हे आदेश बजावण्यात आले आहेत. यिंगलूक यांचे सर्मथक आणि त्यांचे विरोधकांनाही समन्स पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. थिव्हज येथील रॉयल थाइ आर्मी प्रेक्षागृहात यिंगलूक यांनी हजेरी लावली. काळ्या रंगातील बुलेटप्रूफ व्हॅन आणि संरक्षक ताफ्यासह यिंगलूक बैठकीला उपस्थित होत्या, परंतु त्यांना थिव्हज येथून लष्कराच्या अन्य ठिकाणी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांना स्थानबद्ध करण्यात आले किंवा नाही, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

155 नेत्यांना समन्स
155 नेत्यांना लष्कराच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांना अटक केली जाईल, असे लष्कराने म्हटले आहे.