आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thailand News In Marathi, Yingluck Shinawatra, Court, Bankok, Divya Marathi

थायलंड: यिंग्लूक शिनवात्रांना दे धक्का,सार्वत्रिक निवडणूक ‘अवैध’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - थायलंडमध्ये गेल्या महिन्यात घेण्यात आलेली सार्वत्रिक निवडणूक ‘अवैध’ असल्याचा निर्वाळा देशाच्या संवैधानिक न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यामुळे काळजीवाहू पंतप्रधान यिंग्लूक शिनवात्रा यांना जोरदार राजकीय धक्का बसला आहे.


देशात 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रिया न्यायालयाने फेटाळून लावली. निवडणुकीची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे देशाच्या 108 कलमाचे उल्लंघन झाले आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. देशाच्या कायद्यानुसार सार्वत्रिक निवडणूक एकाच दिवशी देशभरात होणे अपेक्षित आहे, परंतु फेब्रुवारीमध्ये हे दिसून आले नाही. संवैधानिक न्यायालय पीठाने याचिका 6-3 मतांनी फेटाळून लावली.

सत्ताधारी पक्ष बिनविरोध
निवडणुकीमध्ये सत्ताधारी फिऊ थाई पार्टी अविरोध विजयी झाली होती. विरोधी पक्षाचा बहिष्कार असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा झाला होता. न्यायालयात लोकायुक्त प्रोफेट व्हिचिटछोलछाई, उपपंतप्रधान पाँगथेप थेपकांचना यांच्याकडून ठोस पुरावे सादर केले.


सत्ताधारी पक्ष बिनविरोध
निवडणुकीमध्ये सत्ताधारी फिऊ थाई पार्टी अविरोध विजयी झाली होती. विरोधी पक्षाचा बहिष्कार असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा झाला होता. न्यायालयात लोकायुक्त प्रोफेट व्हिचिटछोलछाई, उपपंतप्रधान पाँगथेप थेपकांचना यांच्याकडून ठोस पुरावे सादर केले.


नव्याने निवडणूक
थायलंडमधील गेल्या महिन्यात झालेली निवडणूक अवैध ठरवण्यात आल्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश बजावले आहेत. करून नवीन तारीख जाहीर करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.


कशामुळे निवडणूक बेकादेशीर ?
देशातील दक्षिण भागातील 8 प्रांतांतील 28 मतदारसंघांत एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेला नव्हता. त्यामुळे त्याच दिवशी देशभरात निवडणूक घेण्यात आली नाही, त्यामुळे ही निवडणूक सार्वत्रिक नव्हती या आधारावर न्यायालयाने हा निर्णय दिला.