आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thailand The Death Railway From Bangkok To Burma, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडची मृत्यूला कवटाळणारी रेल्वे, निर्मिती दरम्यान अनेकांनी गमावले होते प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंचानाबुरी - थायलंड आणि म्यानमारच्या दरम्यान प्रसिध्‍द अशा रेल्वे मार्गाला डेथ रेल्वे नावाने ओळखले जाते. ही रेल्वे दुस-या महायुध्‍दातील कैद्यांच्या श्रमांची आठवण करुन देते. डेथ रेल्वे मार्ग हा थायलंडची राजधानी बँकॉकला म्यानमारची राजधानी रंगूनशी जोडते.
या मार्गाची निर्मिती जपानने 1943 मध्‍ये केली होती. जपानला दुस-या महायुद्धात ब्रम्हदेशामध्‍ये ( आताचा म्यानमार) चालू असलेल्या लष्‍करी मोहिमांसाठी आपले सैन्य पोहोचवता यावे या उद्देशाने रेल्वे डेथची बांधणी करण्‍यात आली. 1947 मध्‍ये हा मार्ग बंद करण्‍यात आला. पण दहा वर्षांनंतर तो रेल्वेमार्ग पुन्हा थायलंडने सुरु केले. डेथ रेल्वे मार्गाची बांधणी कैद्यांकडून करण्‍यात आली. यात 1 लाख 80 हजार आशियाई मजूर आणि 60 हजार युध्‍द कैद्यांचा समावेश होता. यात 90 हजार आशियाई आणि 12 हजार 399 कैद्यांचे प्राण गेले. हे कैदी ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, डच आणि अमेरिका या देशातील होते.

थायलंडमध्‍ये येणा-या पर्यटकांची पहिली पसंती वाई नदीवर असलेल्या 415 किमी लांब असलेल्या डेथ रेल्वे मार्गा असते. या मार्गाचा पुल बँकॉकच्या 80 मैल दूर असलेल्या कंचानाबुरी येथे बनवण्‍यात आला आहे. येथेच झीथ संग्रहालय आणि दुसरे महायुध्‍दाचे संग्रहालयही आहे. 1957 मध्‍ये आलेल्या एका चित्रपटाने या रेल्वेला प्रसिध्‍द केले.

केव्हा झाली निर्मिती ?
थायलंड आणि बर्मावर राज्य करणा-या ब्रिटिशांनी 20 व्या शतकात डेथ रेल्वेचा सर्व्हे केला होता. मात्र जंगले, पर्वते आणि नद्यांच्या अडथळ्यांमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. जपानी सैन्यांने थायलंड आणि बर्मामधील ब्रिटिश सरकारच्या वसाहतींवर वर्चस्व मिळवले. बर्मामधील सुरक्षेसाठी जपानला एका मार्गाची गरज होती. यामुळे 1942 मध्‍ये जपानने डेथ रेल्वेची बांधणी करण्‍यात आली.

पुढे पाहा.. थायलंडमधील डेथ रेल्वेची आताची आणि निर्मिती दरमानची छायाचित्रे...