आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंड: यिंगलूक यांचा राजीनाम्यास नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडची संसद बरखास्त करण्यात आल्याने भावनिक झालेल्या मावळत्या पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांना मंगळवारी अश्रू आवरता आले नाहीत, परंतु शिनवात्रा यांनी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजीनामा देणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने विरोधक नाराज झाले आहेत. चोवीस तासांत यिंगलूक यांनी राजीनामा द्यावा, असा इशारा देण्यात आला आहे.
आपण सर्व थाई आहोत. आपण परस्परांना का दुखावतोय. सध्या तरी मी मागे हटले आहे. मला आणखी किती मागे जावे लागेल. तुम्ही मला थायलंडच्या भूमीवर पाय ठेवण्यासही मज्जाव केला जाईल का? असा सवाल यिंगलूक यांनी केला आहे. लष्करी क्लबसंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.