आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन केनेडी हत्येचे दृश्य टिपले गेले होते कॅमेर्‍यात..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी त्या वेळी लाइफ मासिकाचा लॉस एंजलिसचा ब्युरो चीफ होतो. अचानक फोन आला, डलासमध्ये केनेडी यांना (शुक्रवार, 22 नोव्हेंबर 1963) गोळ्या घातल्या गेल्या. मी न्यूयॉर्क सिटीमध्ये माझ्या संपादकाला विचारले की, आपण आता काय केले पाहिजे? उत्तर होते, तुम्ही जेवढे शक्य तेवढे लवकर डलास पोहोचा. तासाभरानंतर आम्ही नॅशनल एअरलाइन्सने डलासकडे निघालो होतो. तेथे संध्याकाळी 6 वाजता लाइफची अंशकालीन वार्ताहर पेट्सी स्वँकने सांगितले की, एक स्थानिक व्यापारी जेप्रूडर अब्राहमने घटनास्थळी डिले प्लाझावर हत्येचे दृश्य आपल्या मुव्ही कॅमेर्‍यात टिपले असल्याची माहिती तिला मिळाली आहे.
टेलिफोन डिरेक्टरीमध्ये जेप्रूडरचा नंबर पाहून मी फोन लावला. तो कपड्याच्या कारखान्याचा मालक होता. कित्येक वेळा फोन लावल्यानंतर रात्री 11 वाजता त्याच्याशी संपर्क झाला. त्याने मान्य केले की, केनेडी हत्येच्या घटनाक्रमाचे फोटो त्याच्याकडे आहेत. खूप समज दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी 9 वाजता भेटायला तयार झाला. मी तिथे 8 वाजता पोहोचलो. जेप्रूडर सिक्रेट सर्व्हिसच्या दोन एजंट्सना फिल्म दाखवणार होता. त्याने मलाही सामील करून घेतले. खिडकी नसलेल्या एका खोलीत प्रोजेक्टर लावण्यात आले होते. पांढरी भिंत बनली पडदा.
पहिल्या काही फिल्म्समध्ये जेप्रूडरचे काही कर्मचारी दाखवण्यात आले होते. ते राष्ट्राध्यक्षांना पाहायला आले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्षांचा ताफा समोर आला. त्यांची लिमोझीन कार रस्त्याच्या साइनबोर्डने थोड्या वेळेसाठी झाकून टाकली. मग काही सेकंदात केनेडी यांनी आपला गळा धरून ठेवला होता. टेक्सासचे गव्हर्नर त्यांच्यावर झुकलेले होते. त्यांची पत्नी अस्वस्थ होती. फिल्म 313 मध्ये ली हार्वे ओसवाल्डची गोळी राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यात लागताना दाखवण्यात आली आहे. हा माझ्या पत्रकारितेच्या आयुष्यातील सर्वात नाट्यमय क्षण होता. काही तासांपूर्वी झालेली हत्या आम्ही पाहत होतो. मी निश्चय केला की, फिल्म घेतल्याशिवाय ऑफिसला जाणार नाही.
जेप्रूडरने 26 सेकंदांची फिल्म आम्हाला तीनदा दाखवली. दरम्यान, हॉलच्या बाहेर कुजबुज सुरू झाली होती. जवळपास दोन डझन पत्रकार तिथे पोहोचले होते. बहुतेक माझ्यासारखीच त्यांनाही 9 वाजेची वेळ देण्यात आली होती. फक्त संध्याकाळी अर्ध्या तासाचे बातमीपत्र येत असे. तीन प्रमुख टीव्ही नेटवर्कर्सचे लक्ष डलासमध्ये झालेल्या गुन्ह्याऐवजी वॉशिंग्टनमध्ये होणार्‍या अंत्यसंस्कारावर होते. जेप्रूडरने सगळ्यांना फिल्म दाखवली, मात्र म्हणाला की, लाइफच्या स्टोलीने सर्वात अगोदर संपर्क केल्यामुळे प्रिंट आणि प्रसारण अधिकारासंबंधी त्यांच्याशी बोलतो.
मी जेप्रूडरला वचन दिले की, लाइफ फिल्मचा दुरुपयोग करणार नाही. तिकडे हॉलमध्ये पत्रकार आक्रमक झाले. ते जोरजोरात खोलीचा दरवाजा ठोकत होते. मी प्रिंटसाठी 5000 डॉलरची बोली केली आणि 50 हजारपर्यंत पोहोचलो. जेप्रूडरने मान्य केले. मागच्या दाराने फिल्म घेऊन मी निघून गेलो. लाइफने एक लाख डॉलर जादा देऊन फिल्म विकत घेतली आणि टीव्ही अधिकारही प्राप्त केले.
1970 मध्ये जेप्रूडरच्या मृत्यूनंतर एकदा त्यांचे भागीदार इर्विन श्वार्त्झ भेटले. ते म्हणाले की, ‘आपण फिल्मचा दुरुपयोग करणार नाही’, हे वचन तुम्ही पाळले आहे. तुमच्या सुसंस्कृतपणामुळे आणि प्रामाणिकपणाने बाजी पलटवली आहे. पैशांची गोष्ट कराल, तर तेवढे पैसे इतरही प्रकाशक देणारच होते. आमच्यामध्ये चर्चा होत असताना मी जेप्रूडरला पूर्ण सन्मान देत होतो. तिकडे काही पत्रकारांनी जेप्रूडरच्या सहायक महिलेशीही आक्षेपार्ह वर्तन केले होते.


काही क्षणांपूर्वी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची 22 नोव्हेंबर 1963 रोजी डलासमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली होती. गोळी लागण्याच्या काही थोड्या वेळापूर्वी उघड्या कारमध्ये केनेडी (डावीकडे) आणि पत्नी जॅकलीन.

(स्टोली लाइफ मासिकाचे माजी संपादक आहेत.)