आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेसबॉल टीम मालकाकडून ‘बोस्टन ग्लोब’ ची खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेसह युरोपात अनेक वर्षांची परंपरा असलेल्या वृत्तपत्रांची विक्री सुरू झाली आहे. म्हणूनच अमेरिकेतील आघाडीच्या व 141 वर्षे जुन्या ‘द बोस्टन ग्लोब ’ वृत्तपत्राची विक्री करण्यात आली आहे. हे वृत्तपत्र बोस्टन रेड सॉक्स या बेसबॉल संघाच्या मालकाने खरेदी केले आहे.

बोस्टनची मालकी टाइम्स समुहाकडे होती. 63 वर्षीय जॉन डब्ल्यू हेन्री यांनी हे वृत्तपत्र विकत घेतले आहे. हेन्री यांनी सुमारे 7 कोटी डॉलर्स रक्कम देऊन त्याची खरेदी केली आहे. हेन्री बोस्टन रेड सॉक्स या बेसबॉल संघाचे मालक आहेत. या खरेदीबरोबरच हेन्री यांना टाइम्सच्या न्यू इंग्लंडमधील इतर आस्थापनांवरही मालकी हक्क मिळाला आहे. अर्थात बोस्टन डॉट कॉम, ग्लोब डायरेक्ट (मार्केटिंग कंपनी), द वर्स्टर टेलिग्राम अँड गॅझेट (स्थानिक वृत्तपत्र, मॅसाच्युसेट्स) या संस्थाही आता हेन्री यांच्या अधिपत्याखाली आल्या आहेत. हेन्री यांची रेड सॉक्स आणि लिव्हरपूल फुटबॉल क्लबमध्ये कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे इतरही काही संघ आहेत. गेल्या वर्षी देखील टाइम्सने आपल्या समुहातील प्रादेशिक वृत्तपत्रांची विक्री सुरू केली आहे. प्रादेशिक वृत्तपत्राच्या खप व उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने टाइम्सने त्यांना विकून मुख्य वृत्तपत्रावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 1993 मध्ये टाइम्सने ग्लोबची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्टीफन टेलर यांच्याकडून काही आर्थिक मदत घेतली होती. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर नोकरकपातीचाही मार्ग अवलंबण्यात आला. आॅनलाइन क्षेत्रातून जाहिरातीच्या माध्यमातून महसूल उभा करण्याचे प्रयत्नही तोकडे ठरले.

वैभवशाली इतिहास
‘द बोस्टन ग्लोब’ ला अमेरिकेतील वैभवशाली वृत्तपत्र म्हणून लौकिक लाभला आहे. केवळ 141 वर्षांचा इतिहास एवढीच मर्यादीत त्याची ओळख नाही. अनेक क्षेत्रातील विषयांना न्याय मिळवून देण्यात वृत्तपत्राने मोलाची कामगिरी केली आहे. म्हणूनच ‘ग्लोबची पत्रकारिता’ हा पुरस्कारातील मानबिंदू मानला जातो. या वृत्तपत्राची मालकी टाइम्स समुहाकडे होती. परंतु त्या अगोदर ग्लोब टेलर कुटुंबियांकडे होती. 1873 पर्यंत ही मालकी स्टीफन टेलर यांच्याकडे होती. त्यानंतर टाइम्स समुहाने ते खरेदी केले. त्यावेळी टाइम्सने ग्वोबच्या खरेदीसाठी त्या काळची सर्वात अधिक रक्कम मोजली होती.